Ad will apear here
Next
ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरला ‘इंडियन अचिव्हर्स’ पुरस्कार


सातारा : आरोग्य क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत अद्ययावत उपचारपद्धतींसह ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त करून रुग्णांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरला बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटल म्हणून ‘इंडियन अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते रुग्णालयाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या वेळी सोबत रुग्णालयाचे वरिष्ठ ऑन्को सर्जन डॉ. मनोज लोखंडेही उपस्थित होते.

सातारा येथील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर या सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना तीन वर्षांपूर्वी ५२ बेडच्या रुग्ण क्षमतेसह रेडीएशन, शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या अशा स्वरूपात झाली. या तीन वर्षांच्या कालावधीत हॉस्पिटलने अनेक आव्हानात्मक रुग्णांना सर्वोत्तम उपचार देऊन रुग्णांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे व या विश्वासाच्या बळावरच हॉस्पिटलने तब्बल सात हजारांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविली असून, पेट सिटी स्कॅनसारखी अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध करून देणारे पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिलेच हॉस्पिटल आहे. अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे कर्करोगाबाबत अधिकाधिक जनजागृतीसाठी हॉस्पिटल अधिक प्रयत्नशील असून, हल्लीच रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले एनएबीएच मानाकंनसुद्धा मिळविले आहे. हॉस्पिटलमधील स्वच्छता ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉस्पिटलच्या बरोबरीचीच आहे.

या शिवाय हॉस्पिटलकडून मोठ्या प्रमाणात कॅन्सर प्रतिबंधात्मक शिबिरे राबवली जात असून, यामधून संशयास्पद रुग्णांचे मोफत समुपदेशन केले जाते व या तपासणीत रुग्णात जर कॅन्सरची लक्षणे आढळून आली, तर त्वरीत इलाज सुरू केला जातो, त्यामुळे रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यास या कार्यक्रमांचा खूपच उपयोग होताना दिसत आहे.

याशिवाय कॅन्सरविरोधी साक्षरता कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील हॉस्पिटलच्या डॉ. संगीता पाटील या कॅन्सरची कारणे व लक्षणे याबद्दल अतिशय कळकळीने सांगत असतात. तसेच हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील निदान व त्यावरील सर्व प्रकारचे उपचार होत असून, या ठिकाणी रेडिएशनसाठी असणारी मशीन, पेट-सिटी व इतर सर्व मशिन्स या आजघडीला जगातील सर्वांत अत्याधुनिक मशीनपैकी एक आहेत. याशिवाय सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रशस्त ‘डे केअर वॉर्ड’ ही हॉस्पिटलची वैशिष्ट्येच म्हणावी लागतील.

हे सर्व उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत होत असून, गरज पडल्यास रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे आणण्यासाठी सुद्धा हॉस्पिटल मार्गदर्शन करते. याशिवाय याठिकाणी सर्व प्रकारच्या विमा योजना, कॅशलेस सुविधा उपलब्ध असून, हॉस्पिटलला तीन पूर्णवेळ समुपदेशक आहेत.

‘महाराष्ट्रातील बेस्ट कॅन्सर हॉस्पिटल’ म्हणून पुरस्कार मिळवण्यामागच्या यशाचे हेच गमक असल्याचे सांगत देशमुख म्हणाले, ‘हा रुग्णांनी ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरवर दाखविलेला विश्वास असून, या यशात आमचे तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व रुग्णालयाचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. हा पुरस्कार रुग्णालयाचे नाव महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटलचा बहुमान मिळवून देणाऱ्या प्रत्येकाचा असून, या मुळे आमची रुग्णांप्रती असलेली जबाबदारी अधिकच वाढली आहे. त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या पुरस्काराने सातारासारख्या शहरातही आरोग्य क्रांती होत असल्याचे हे द्योतक आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZJGBW
Similar Posts
सातारा जिल्ह्यात महिलेवर यशस्वी ब्रॅकीथेरपी सातारा : येथील ऑन्को लाइफ सेंटरमध्ये डॉ. करण चंचलानी यांनी अत्याधुनिक ब्रॅकीथेरपीचा वापर करून अवघ्या एका आठवड्यात स्तनांचा कर्करोग असलेल्या ६६ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार केले.
‘ऑन्को लाइफ’ला ‘एनएबीएच’ची मान्यता सातारा : शेंद्रे येथील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर या सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलला ‘हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ’ (एनएबीएच) या संस्थेची मान्यता मिळाली असून, हे जिल्ह्यातील पहिले ‘एनएबीएच’ मान्यताप्राप्त सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय ठरले आहे.
‘आँको लाइफ’तर्फे मौखिक कर्करोग दिन साजरा सातारा : शेंद्रे येथील आँको लाइफ कॅन्सर सेंटरतर्फे मौखिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून २७ जुलै रोजी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक विभाग, दंत विभाग आणि कर्करोग प्रतिबंध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन केले होते
‘आयपीसी’तर्फे मोफत तपासणी शिबिर पुणे : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरतर्फे (आयपीसी) सहा ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरबाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language